Advertisement

मोदींचा हस्ते १८ डिसेंबरला मेट्रो, समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजून आचारसंहिता लागण्याच्या आत या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सरकारचा घाट आहे. त्यातूनच १८ डिसेंबरला पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यावेळीच हे भूमिपूजन उरकण्याचा सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने मंत्रालयात तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र 'एमएसआरडीसी'तील उच्च पदस्थ अधिकारी मात्र या वृत्ताला नाकारत आहेत.

मोदींचा हस्ते १८ डिसेंबरला मेट्रो, समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई मेट्रो योजनेतील मेट्रो प्रकल्पाचं तसंच मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) च्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने समृद्धीच्या भूमिपूजनाचं वृत्त फेटाळलं आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र मंत्रालयीन स्तरावर मेट्रोच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असून आमच्यापर्यंत अद्याप कोणतीही सूचना आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं येत्या एक-दोन दिवसांतच समृद्धी महामार्ग आणि मेट्रोचं भूमिपूजन होणार का हे स्पष्ट होईल.


महत्त्वाकांक्षी प्रकल्प

एकूण ७१० किमीचं मुंबई-नागपूर अंतर कमी करत प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. 'एमएसआरडीसी'च्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येत असून या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाल्याचं म्हणत आता राज्य सरकारनं या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महाराष्ट्रातील मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन व्हावं, अशीच राज्य सरकारची इच्छा आहे.


आचारसंहितेच्या आत

शिवाय लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजून आचारसंहिता लागण्याच्या आत या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सरकारचा घाट आहे. त्यातूनच १८ डिसेंबरला पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यावेळीच हे भूमिपूजन उरकण्याचा सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने मंत्रालयात तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र 'एमएसआरडीसी'तील उच्च पदस्थ अधिकारी मात्र या वृत्ताला नाकारत आहेत.


मेट्रोचंही भूमिपूजन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रोच्या (२३.६ किमी) कामांचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार १८ डिसेंबर रोजी कल्याणला उपस्थित राहणार आहेत.  


कुठला मार्ग ?

कल्याणमधील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून २०३१ मध्ये येथील लोकसंख्या ४६ लाखांपर्यंत जाणार आहे. तर भिवंडीतील लोकसंख्या १३ लाखांवर जाणार असल्याने या परिसरात मेट्रोची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळेच एमएमआरडीएच्या माध्यमातून या परिसरात मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो ९ (दहिसर-मिरा रोड-भाईंदर) असे २ मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.

या महत्वाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गणेश बोडके यांनी दिली. या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडके मैदानात होणार आहे. या मैदानात काही जणांना लग्नाची परवानगी देण्यात आली होती. परंतु मोदी येणार असल्याने ही परवानगी रद्द करण्यात आली आहे.    

या नंतर मोदी पंतप्रधान मोदी पंतप्रधान आवास योजने (PMAY)अंतर्गत सिडको (CIDCO) कडून बनवण्यात येणाऱ्या ६० हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत.



हेही वाचा-

मतदारांनी मोदींच्या धमक्यांना थारा दिला नाही- शरद पवार

मोदी, शहांच्या मुजोरीला उत्तर- राज ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा