Advertisement

वरळीत पोलीस पत्नींनी राजू वाघमारेंचा बॅनर फाडला


वरळीत पोलीस पत्नींनी राजू वाघमारेंचा बॅनर फाडला
SHARES

पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सध्या नायगाव, वरळी, शिवडी आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा सरकारसोबत वाद सुरू आहे. या चाळीत राहणारे पोलीस कुटुंब देखील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. 

गेल्या १० वर्षांपासून ते हक्कांच्या घरासाठी लढा देत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पोलिसांना हक्काची घरे देण्याची घोषणा करताच सुरू झाला श्रेयवादाचा खेळ. एका बाजूला भाजपा, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस अशी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी 'वरळीतील बीडीडी चाळीत ३० वर्षे राहणाऱ्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार, राजू वाघमारे यांच्या लढ्याला यश', अशा मजकुराचा बॅनर लावताच संतप्त रहिवासी आणि पोलीस पत्नी महिला संघटनेने हे बॅनर फाडले आणि वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे यश वाघमारे यांच्यामुळे नव्हे, तर संघटनेच्या लढ्यामुळे मिळाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.


सन १९८० पासून मी पोलिसांच्या घरांसाठी लढत आहे. इतर रहिवाशांकडून १८ रुपये भाडे घेतले जात असताना पोलिसांकडून ४००० रुपये भाडे घेतले जाते. हे चुकीचे आहे. ३० वर्षांचा हिशेब लक्षात घेता, पोलिसांनी आतापर्यंत भाड्यापोटी १५ ते १६ लाख रुपये नक्कीच भरले असतील. पोलीस कुटुंबांना आमचा लढा ठाऊक आहे. मुख्यमंत्र्यानी केवळ विधानसभेत घोषणा करून आमची मागणी पूर्ण केली. आमची मागणी पूर्ण झाल्याने आम्ही त्याचे श्रेय का घेऊ नये?
- राजू वाघमारे, प्रवक्ते, काँग्रेस


पोलिसांच्या घरांसाठी १९८० पासून लढा देत असल्याचा राजू वाघमारे यांचा दावा असेल, तर १५ वर्षांच्या काँग्रेस सरकारच्या काळात ही मागणी पूर्ण करून घेण्यात त्यांना यश का आले नाही? अशी घोषणा यापूर्वी कुठल्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला का करता आली नाही? पोलीस पत्नी आणि भाजपा नेते सुनील राणे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले आहे. त्याला प्रत्येक पोलीस कुटुंबातील व्यक्ती साक्षीदार आहे.
दीपक पाटील, अध्यक्ष, पोलीस पत्नी संघटना



हे देखील वाचा -

बीडीडीवरून काँग्रेसमधील 2 नेते आमने-सामने



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा