Advertisement

'महाराष्ट्रालाही तलवारीच्या धारीचा इतिहास' मनसेचं निरुपम यांना सडेतोड उत्तर


'महाराष्ट्रालाही तलवारीच्या धारीचा इतिहास' मनसेचं निरुपम यांना सडेतोड उत्तर
SHARES

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या घटनेचं समर्थन करणारं ट्विट केलं होतं. त्या ट्विटला मनसेनंही सडेतोड उत्तर दिलं आहे. 'दादागिरीने लाठ्या बरसल्या तर, महाराष्ट्रालाही तलवारीच्या धारीचा इतिहास आहे', अशा शब्दांत मनसेनं निरुपम यांना सुनावलं आहे.


मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

रविवारी मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि शिंदे यांच्यावर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. यांच्या व्यतिरिक्त मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला होता.


संजय निरुपम यांचे ट्विट

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या घटनेचे समर्थन करत 'विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला, आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुेळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी', असं ट्विट केलं होतं.


हेही वाचा - 

मनसेच्या उपशाखा अध्यक्षाला फेरीवाल्यांकडून जबर मारहाणRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement