Advertisement

'युती'साठी भाजपकडून शिवसेनेला राज्यसभेची 'ही' ऑफर

शिवसेनेनं भाजपसमोर युतीसाठी १९९५ सालचा फॉर्म्युला ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच युती करायची असेल तर आधी विधानसभा जागा वाटपाचं सूत्र निश्चित करण्याचीही अट शिवसेनेनं घातलीय.

'युती'साठी भाजपकडून शिवसेनेला राज्यसभेची 'ही' ऑफर
SHARES

संभ्रमावस्था असतानाही भाजपकडून युतीसाठी आग्रही भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेनं भाजपसमोर युतीसाठी १९९५ सालचा फॉर्म्युला ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच युती करायची असेल तर आधी विधानसभा जागा वाटपाचं सूत्र निश्चित करण्याचीही अट शिवसेनेनं घातलीय. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी फोनवर संपर्क साधत ५०-५० अशा नव्या फॅर्म्युल्यासह राज्यसभेची ऑफर दिल्याचं कळतंय.


काय आहे भाजपची आँफर?

देशात २०१९च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपनं शिवसेनेला सोबत घेण्यासाठी ५०-५० असा नवा फॉर्म्युला ठेवत राज्यसभेची ऑफर दिली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर जागावाटपाबाबत चर्चा केल्याचं कळतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसोबतच विधानसभेचाही जागा वाटपाचा तिढा सोडवण्यावर भर दिल्याचं कळतंय. तसंच उद्धव ठाकरेंकडून जागावाटपासाठी १९९५ सालीचा फॉर्म्युला पुढे केल्याचंही कळतंय. शिवसेनेच्या कठोर भूमिकेमुळे युतीचा पेच सुटता सुटत नसल्याचं दिसून येतंय.


१९९५ सालचा 'युती'चा फॉर्म्युला?

१९९५ साली फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेनं त्यावेळी २२८ जागांपैकी १६९ जागा लढवल्या होत्या. तर भाजपनं ११६ जागा लढवल्या होत्या. मात्र सध्याच्या परिस्थितीत भाजपचे विधानसभेत १२२ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेनं १९९५च्या फॉर्म्युला पुढे करून भाजपला पेचात टाकले आहे.



हेही वाचा

देशात अघोषित आणीबाणी : प्रकाश आंबेडकर

एकत्रित निवडणूकांसाठी मुख्यमंत्री राज्यमंत्रीमंडळ बरखस्त करतील : अशोक चव्हाण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा