Advertisement

स्वबळाची भाषा करणाऱ्यांना जनता पळायला लावेल- प्रविण दरेकर

महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना 'पळ' काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

स्वबळाची भाषा करणाऱ्यांना जनता पळायला लावेल- प्रविण दरेकर
SHARES

सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना 'पळ' काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या स्वबळाच्या भाषेवरून सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेनेत (shiv sena) धुसफूस सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाची भाषा करत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे फारसं पटलेलं नाही. त्यावरून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे.

त्यातच नाना पटोले यांनी लोणावळ्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केल्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. 

हेही वाचा- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले यांचा खुलासा

महाराष्ट्रात काँग्रेस (congress) उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केला होता. त्यामुळे काँग्रेसशी (congress) विसंवाद वाढू लागला आहे.

त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, मला वाटतं यांना पक्षाच्या स्वबळाचं पडलेलं आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाहूत बळ राहिलेलं नाही. ताकद उरलेली नाही. कामगार देशोधडीला लागत आहे. कामगारांच्या हातात बळ राहिलेलं नाही. अशा वेळेला यांना स्वबळाचं पडलेलं आहे. परंतु अशाप्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले, तर याठिकाणी बळ बळ करत बसताना, जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा