Advertisement

कोविंद यांनी घेतली भाजपासह मित्रपक्षांच्या आमदार, खासदारांची भेट


कोविंद यांनी घेतली भाजपासह मित्रपक्षांच्या आमदार, खासदारांची भेट
SHARES

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद शनिवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी भाजपासह मित्र पक्षातील आमदार खासदार यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री अनंत गीते, दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सह भाजपा शिवसेनेचे मंत्री तसेच आमदार देखील उपस्थित होते.


ढोल ताशाच्या गजरात स्वागत

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचे स्वागत केले. त्यानंतर रामनाथ कोविंद मरिन ड्राईव्ह येथील गरवारे क्लबमध्ये दाखल झाले. यावेळी त्याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.




राजू शेट्टींची दांडी

स्वभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मात्र दांडी मारली. आपला दौरा पूर्व नियोजित असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.



ही काळ्या दगडावरची रेघ...

आमच्याकडे काँग्रेस पेक्षा जास्त आमदार खासदारांचे संख्याबळ आहे त्यामुळे आमचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद निवडून येतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.


उद्धव ठाकरे यांचे आदेश

रामनाथ कोविंद यांना निवडून आणा, असे आदेश आम्हाला उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्यामुळे आमचे आमदार खासदार कोविंद यांना मतदान करतील, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.


रामनाथ कोविंद यांनी मला स्वता: फोन केला मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात. शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

हे देखील वाचा -

राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून क्रॉस व्होटिंग?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा