वर्षभरात भाजपाला ४०० कोटींची देणगी

देणगी मिळवण्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर अाहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत भाजपाचा देणगीचा अाकडा अाणखी वाढू शकतो.

SHARE

राजकीय पक्षांमध्ये देणगी मिळवण्यात भाजपाने अाघाडी घेतल्याचं दिसून येत अाहे. २०१७-१८ या वर्षात भाजपाला ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली अाहे. भाजपाने निवडणूक अायोगाला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर अाली अाहे. तर काँग्रेसने २६ कोटी रुपये देणगी मिळाल्याचं निवडणूक अायोगाला सांगितलं अाहे. 


अाकडा वाढणार

देणगी मिळवण्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर अाहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत भाजपाचा देणगीचा अाकडा अाणखी वाढू शकतो. याचं कारण म्हणजे भाजपा अाणि काँग्रेसने अातापर्यंत अापले वार्षिक आयकर रिटर्न अाणि ताळेबंद सादर केलेला नाही. 


उद्योगांकडून देणगी

प्रूडेंट इलेक्टोरलच्या अहवालानुसार, २०१७-१८ या अार्थिक वर्षात उद्योगांकडून राजकीय देणगी मिळवणाऱ्या इलेक्टोरल ट्रस्टचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला अाहे. प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्टने या कालाधीत १६९ कोटी रुपये उभारले अाहेत. यामधील १४४ कोटी रुपये भाजपाला देण्यात अाले. याशिवाय डीएलएफने प्रूडेंटला सर्वाधिक ५२ कोटी रुपये दिले. तर भारती समूहाने ३३ कोटी,  यूपीएलने २२ कोटी अाणि गुजरातच्या टॉरेंट समूहाने २० कोटी, डीसीएम श्रीराम समूहाने १३ कोटी, कॅडिला समूहाने १० कोटी अाणि हल्दिया एनर्जीने ८ कोटी रुपये ट्रस्टला दिले अाहेत. 


९० टक्के पैसे प्रूडेंटला 

मागील ४ वर्षात इलेक्टोरल ट्रस्ट्सना कंपन्यांकडून जो पैसा मिळाला त्यामधील ९० टक्के पैसे प्रूडेंटला मिळाले अाहेत. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत १८ हप्त्यांमध्ये प्रूडेंटने भाजपाला १४४ कोटी रूपये दिल्याचं समोर अालं अाहे. तर २०१७ मध्ये काँग्रेसला देणगीचे ४ धनादेश देण्यात अाले. २०१४ मध्ये सत्ता अाल्यानंतर भाजपाला मिळणाऱ्या देणगीत मोठी वाढ झाली अाहे. हेही वाचा - 

ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका काढा, मंथन परिषदेत मागणी

आधी शिवनेरी, मग अयोध्या, उद्धव ठाकरे गडावरील माती कलशात भरून नेणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या