राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची शाळा

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पत्रकारांची चांगलीच शाळा घेतली. इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही पत्रकारांनी मिळून दिवाळी अंक काढला त्याचे प्रकाशन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते. मासिक किंवा वृत्तपत्र काढण्याची इच्छा, नोटबंदी, आणीबाणी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांना चिमटे काढले. प्रिंट मीडियात चुकीच्या बातमीबद्दल माफी मागितली जाते, न्यूज चॅनल्स तसं करत नाहीत याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील न्यूज अँकरचीही शाळा केली.

Loading Comments