Advertisement

वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर राजू शेट्टी संतापले, म्हणाले तिची औकात...

भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य तिनं केलं होतं.

वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर राजू शेट्टी संतापले, म्हणाले तिची औकात...
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतनं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

“कंगना रणौत या बाईची स्वातंत्र्यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का, हे आधी तिने तपासून पहावे,” अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले आहे.

मुलाखत देत भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वादग्रस्त वक्तव्य तिनं केलं होतं. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय.

पुढे शेट्टी म्हणाले, “भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोसपर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना रणौत सारख्या एखाद्या नटीनं अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे,” असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनानं ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

“देशाला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असं सांगतात. तसंच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असं कंगना म्हणाली.



हेही वाचा

राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, पण ठेवली 'ही' अट

देवेंद्र फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा