Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला ‘रिपब्लिकन’चा अवमान- रामदास आठवले

अमेरिकेतील संसदेत झालेल्या हिंसाचाराचा जगभरातून तीव्र निषेध केला जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या घटनेची निंदा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला ‘रिपब्लिकन’चा अवमान- रामदास आठवले
SHARES

अमेरिकेतील संसदेत झालेल्या हिंसाचाराचा जगभरातून तीव्र निषेध केला जात असताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आरपीआय)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या घटनेची निंदा केली आहे. एवढंच नव्हे, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रिपब्लिकन’ संकल्पनेचा अवमान केल्याचं मतही व्यक्त केलं आहे.

अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून  डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपविणं आवश्यक होतं. ट्रम्प यांनी मात्र या उलट करून स्वतःची प्रतिमा कलंकित करून घेतली आहे.

हेही वाचा- संभाजी राजेंचं नाव वापरणं हा काही गुन्हा नाही- संजय राऊत

अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही, असं आजवर जगात कोणत्याही देशात  घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. भारतात ग्राम पंचायतपासून संसदेपर्यंत लोकशाहीच्या न्यायानुसर बहुमताचा; जन मताचा सन्मान केला जातो, असं मत रामदास आठवले यांनी ट्विटरवरून मांडलं आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला. अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक समजल्या जाणार्‍या कॅपिटॉल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी घुसखोरी करून गोंधळ घालून हिंसक कृत्य केलं. या हिंसाचारात एका महिलेसह ४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यो बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होत असतानाच ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. यामुळे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.

(ramdas athawale reacts on donald trump and violence in american congress)

हेही वाचा- राजीनाम्याच्या चर्चांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा