Advertisement

आठवले म्हणाले, कंगनानं भाजप किंवा RPI मध्ये प्रवेश केल्यास स्वागत

केंद्रीय रामदास आठवले यांनी गुरूवारी सायंकाळी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली.

आठवले म्हणाले, कंगनानं भाजप किंवा RPI मध्ये प्रवेश केल्यास स्वागत
SHARES

केंद्रीय रामदास आठवले यांनी गुरूवारी सायंकाळी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली. आठवले कंगनाच्या मुंबईतल्या घरी गेले आणि तिच्याशी चर्चा केली. पालिकेनं बुधवारी कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. त्यानंतर गुरुवारी कंगनानं कार्यालयाची पाहणी केली.

कंगना रणौतची भेट घेतल्यानंतर आठवले म्हणाले की, तिला राजकारणात प्रवेश करायचा नाही आणि आवडही नाही. मात्र तिनं भाजप किंवा आरपीआयमध्ये प्रवेश केल्यास तिचं स्वागत आहे.

आठवले पुढे म्हणाले, जमेल तेवढं चित्रपटात काम करायचं आहे, असं कंगनानं सांगितलं आहे. तिला समाजात एकता निर्माण करायची आहे असंही तिनं म्हटलं आहे. आगामी चित्रपटात ती दलीत मुलीची भूमिका करणार असल्याचंही तिनं सांगितल्याचं आठवले म्हणाले.

दरम्यान कंगना प्रकरणावर आज शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची बैठक झाली त्यानंतर राऊतांनी भूमिका जाहीर केली.

कंगना रणौत प्रकरणावर राज्यात वादळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाची पुढची दिशा आणि रणनीती काय राहिल हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा