काँग्रेसचा 'रोंबाट'

विलेपार्ले - मुंबई काँग्रेसचा अंतर्गत वाद मुंबईकरांसाठी नवा नाही. याचाच प्रत्यय रविवारी काँग्रेसच्या कोकणवासीय महोत्सवादरम्यान आला. गुरुदास कामत आणि संजय निरुपम या दोघांनी या कार्यक्रमात एकमेकांवर टीका करत वादाला तोंड फोडले.

पक्षामधील हा अंतर्गत वाद पाहून शेवटी काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं. सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल तर काँग्रेसला खंबीर आव्हान उभं करावं लागेल आणि त्यासाठी शिवसेना-भाजपापेक्षाही अंतर्गत गटबाजीला हरवणं आवश्यक असणार आहे.

Loading Comments