Advertisement

मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा- बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र सरकारने केलेल्या मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा- बाळासाहेब थोरात
SHARES

महाराष्ट्र सरकारने केलेल्या मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. मागील अनेक महिन्यांपासून मुद्रांक शुल्कात कपात करण्यात यावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून सातत्याने सरकारकडे करण्यात येत होती. (rate cut in stamp duty will benefit for home buyers and real estate market says maharashtra revenue minister balasaheb thorat)

यासंदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय बुधवार २६ आॅगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर, २०२० पासून ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीकरिता ३ टक्क्यांनी तर १ जानेवारी, २०२१ ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीकरिता २ टक्क्यांनी  कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा - घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, स्टॅम्प ड्युटीत ३ टक्क्यांची कपात

कोविड-१९ मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती. राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेऊन र खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय सकारात्मक आहे. यामुळे गृह खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना तात्पुरता का होईना, परंतु दिलासा मिळेल. सध्या कोरोना संकट आणि इतर कारणांमुळे डबघाईस आलेल्या निवासी घरांच्या बाजारपेठेला यामुळे चालना मिळेल, असं मत नाईट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिरिष बैजल यांनी व्यक्त केलं.

तर राज्य सरकारने गणेशोत्सवात मुद्रांक शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या दरांत घर खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण करता येईल. गृह खरेदीदारांना यामुळे आणखी फायदे मिळतील तसंच गृह नोंदणीलाही वाव मिळेल. निवासी मालमत्ता खरेदी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिशय वाजवी दरांत घर मिळेल आणि त्याच्या हातात पैसा देखील शिल्लक राहीत, असं पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोद्दार यांनी सांगितलं.

हेही वाचा - गुड न्यूज! मुंबईबाहेरील पुनर्विकासाला चालना, MMR साठी वेगळं ‘एसआरए’

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा