घाटकोपर - तिकीट न मिळाल्याने अनेक बंडोबांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील प्रभाग क्रमांक 130 मधून शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने कविता फर्नांडिस अपक्ष म्हणून लढतायेत. तर त्याच भागात शिवसनेकडून कविता वाळंजू यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे या प्रभागात कविता विरूद्ध कविता असा सामना रंगला आहे. 'गंगावाडी परिसरातील नागरिकांनी माझे काम पाहिले आहे, त्यामुळे मीच किंगमेकर ठरेन, असं अपक्ष उमेदवार कविता फर्नांडिस यांनी सांगितले आहे. तर कविता वाळंजू यांनी आपल्यावर पक्षप्रमुखांनी विश्वास दाखवला असल्याचं सांगितलं आहे.