भुजबळांची भेट घेणारे ते आमदार कोण?

    मुंबई  -  

    मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले आणि अनेक दिवस आजाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयात तळ ठोकून बसलेले माजी मंत्री छगन भुजबळ पुन्हा चर्चेत आलेत. छगन भुजबळ यांना पूर्वपरवानगी न घेता अनेक जण भेटत असल्याती माहिती सक्तवसुली संचालनालयानं (इडी) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी केलेल्या जनहित याचिकांवरील सुनावणी मुख्य न्यायमूर्ती मंजूला चेल्लूर आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे झाली. त्यावेळी इडीनं तपासाचा अहवाल देतानाच जप्त केलेल्या मालमत्तांची यादीही सादर केली. दरम्यान, भुजबळ यांना आम्ही नियमबाह्य सुविधा दिली नसल्याचा दावा करणारं पत्र जे. जे. रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी न्यायालयापुढे सादर केल होतं. 27 ऑक्टोबर रोजी थॅलियम स्कॅनची सुविधा नसल्याचं कारण देत जे. जे. रुग्णालयातून छगन भुजबळ यांना खासगी मुंबई रूग्णालयात दाखल हलवण्यात आलं होतं. ते उपचाराच्या नावाखाली 42 दिवस या रूग्णालयात असतांना काही आमदारांसह राजकीय नेते, कार्यकर्ते आणि निकटवर्तीय अशा २६ जणांनी त्यांची भेट घेतली. त्यांची यादीच इडीनं न्यायालयापुढे सादर केली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.