Advertisement

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे झाले काँग्रेसवासी!


माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे झाले काँग्रेसवासी!
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार कुमार केतकर देखील उपस्थित होते. काँग्रेसकडून मात्र ठिपसे यांच्या पक्षप्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा

राहुल गांधी यांनी गोरेगावमध्ये काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर ठिपसे यांनी त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्याच्या वातावरणात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसमधून ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ठिपसे यांनी यावेळी सांगितलं.


सोहराबुद्दीन खटल्यावर वक्तव्य

सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात बड्या आरोपींना मुक्त केलं जात असून हा प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे या खटल्यात फेरतपासणीची गरज निर्माण झाली आहे. वरिष्ठ न्यायालयाने आरोपींना मुक्त करण्याचे दिलेले आदेश पुन्हा तपासून ते योग्य आहेत की नाही याची शहानिशा करावी, असं वक्तव्य ठिपसे यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. या विधानावरून बरीच खळबळ उडाली होती.


कोण आहेत ठिपसे?

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. अभय ठिपसे यांनी सलमान खानची गाजलेली हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे हाताळली आहेत.हेही वाचा-

राहुल गांधी म्हणाले, मी तुमचा रक्षणकर्ता!Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा