Advertisement

रिपाइंला मंत्रीपद, विधानसभेच्या १० जागाही मिळणार?

आठवले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेत रिपाइंला १० जागा सोडण्याची मागणी केली होती. या जागा सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

रिपाइंला मंत्रीपद, विधानसभेच्या १० जागाही मिळणार?
SHARES

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन इथं होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचं नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविलं असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे १ नाव देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आठवले यांनी दिली. या शपथविधी सोहळ्यात आठवले प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रिमंडळात १ मंत्रिपद देण्यात येईल, हे आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही आठवले यांनी मानले. 

आठवले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेत रिपाइंला १० जागा सोडण्याची मागणी केली होती. या जागा सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.  

हेही वाचा-

आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला डच्चू, कुणाला मिळणार संधी?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा