Advertisement

शिवरायांची मोदींशी तुलना, संभाजीराजे संतापले

तान्हाजी (Tanhaji) या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग (morphing) करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून संभाजीराजे संतापले आहेत.

शिवरायांची मोदींशी तुलना, संभाजीराजे संतापले
SHARES

तान्हाजी (Tanhaji) या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग (morphing) करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ पाॅलिटिकल कीडा (political kida) नावाच्या ट्विटर हँडलवरून (twitter handle)  व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती संभाजी (chatrapati sambhaji) संतापले आहेत. भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. संबंधित पक्षानं यावर आपली भूमिका स्पष्ट करून केंद्र सरकारनं चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,' अशी मागणी केली आहे. 'आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या भावनांची कदर करून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करू नये,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  

हेही वाचा- पाॅलिटिकल किडेगिरी, शिवरायांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा

दिल्लील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भलेही भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरून व्हायरल करण्यात आला नसला, तरी यांत भाजप पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजप (bjp) आणि आम आदमी पार्टी (AAP) प्रामुख्याने एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केजरीवाल यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. 

या व्हिडिओत शिवरायांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा चेहरा लावण्यात आला असून तानाजी मालुसरे (tanaji malusare) यांच्या चेहऱ्यावर अमित शहा (amit shah) यांचा आणि उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर अरविंद केजरीवाल यांचा चेहरा माॅर्फ करून टाकण्यात आला आहे.  मोदी आणि शहा दिल्लीचं युद्ध जिंकण्यासाठी निघाल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. तर केजरीवाल त्यांची वाट अडवताना दाखवले आहेत. अखेर दोघांची सरशी झाल्यानंतर दिल्ली इलेक्शन २०२० असं व्हिडिओच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरील तान्हाजी नावाच्या जागी ‘शहा’जी असंही लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप

या आधी भाजपचे दिल्लीतील नेते जयभगवान गोयल (jaibhagwan goyal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी तुलना करणारं ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ (aaj ke shivaji narendra modi) हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकावरून तब्बल दोन आठवडे महाराष्ट्रात राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. या पाठोपाठ शिवरायांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संभाजीराजे संतापले आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा