Advertisement

संजय राऊत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम!

धारदार लेखणी आणि रोकठोक विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आलं आहे.

संजय राऊत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम!
SHARES

धारदार लेखणी आणि रोकठोक विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी मंगळवार ८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्तेपदी तर इतर १० नेत्यांची पक्ष प्रवक्तेपदी नमणूक करण्यात आलेली आहे. (Sanjay Raut appointed as Chief spokesperson of Shiv Sena)

राज्यसभेचे खासदार असलेले संजय राऊत यांची दिल्लीतील राजकीय वर्तुळात चांगलीच उठबस आहे. केवळ राज्यातीलच नाही, तर राष्ट्रीय विषयांवरही मतं व्यक्त करून राऊत शिवसेनेची भूमिका संसदेत आणि संसदेबाहेर देखील अत्यंत आक्रमकपणे मांडताना दिसतात. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपबरोबर टोकाचे मतभेद झाल्यावर संजय राऊत यांनी एकट्याने भाजप नेत्यांना फैलावर घेतलं हाेतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी यशस्वी बोलणी करून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचाही मोलाचा वाटा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशीच त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबिय वा शिवसेनेची बाजू अत्यंत बेधडकपणे मांडत असतात. 

हेही वाचा- कंगनासोबत माझं व्यक्तीगत भांडण नाही, पण..., संजय राऊत पुन्हा बोलले

राम मंदिर प्रकरणावरून भाजपला केलेली टोलेबाजी, वा उदयनराजेंसोबत उडालेली चकमक, सुशांत सिंह राजपूत प्रकरण असो किंवा कंगना रणौतसोबतचा पंगा संजय राऊत आपल्या वाककौशल्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यामुळेच शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांच्या हाती मुख्य प्रवक्तेपदाची धुरा सोपवलेली आहे.  

त्यांच्यासोबतच खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर या नेत्यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा