ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हटले होते. या पत्राची फडणवीस यांनी दखल घेतली आहे. दरम्यान, संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिसांचे (Thane Police) पथक नाशिकला पोहोचले आहे. (security of sanjay raut increase)
मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप
असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचे वर्णन करताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना संजय राऊत यांनी ही माहिती दिली. संजय राऊत यांच्या आरोपांमुळे शिंदे-ठाकरे गटातील तेढ आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या आरोपानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संजय राऊत पत्रात काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, ""गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींवर धमक्या आणि हल्ले वाढले आहेत, ही महाराष्ट्राची परंपरा नाही, महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली, माझी त्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. असे राजकीय निर्णय घेतले जातात, लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा प्रश्न आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही तसे करण्यास सक्षम आहात, तरीही मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्याचा कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचे वृत्त आहे, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा मुद्दा आमच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे.
हेही वाचा