Advertisement

“कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही”- संजय राऊत

कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राठोड यांच्या कारवाईबाबत भाष्य केलं.

“कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही”- संजय राऊत
SHARES

कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावरील कारवाईबाबत भाष्य केलं आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती. या गर्दीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर जवळपास १५ दिवस अज्ञातवासात राहिलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांनी या आत्महत्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसून आपलं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी विरोधकांकडून आरोप केले जात असल्याचा दावा केला. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

हेही वाचा- पोहरादेवीतील गर्दीमुळे संजय राठोडांवर कारवाई?, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी गंभीर दखल घेत कोविडच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले तसंच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याचा अहवाल देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या. यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पाठोपाठ बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीला हजर राहण्यासाठी संजय राठोड मुंबईत दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

त्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, पोहरादेवीत गर्दी करून नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. 

(sanjay raut statement on action against sanjay rathod for violation of covid 19 rules)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा