Advertisement

काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार ?

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर कॉग्रेस पक्ष सोमवारी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार ?
SHARES

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर कॉग्रेस सोमवारी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. या दुसऱ्या यादीमध्ये मुंबईतल्या काही उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. ७ मार्च रोजी कॉग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नावे आहेत. तसंच, राहुल गांधी अमेठी येथून निवडणूक लढवणार असून सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.


मुंबईतील उमेदवार जाहीर होणार ?

कांग्रेसकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच, प्रिया दत्त यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय, दक्षिण-मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड किंवा त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


कॉग्रेस प्रथम

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेसने पहिला नंबर पटकावला आहे. गुरुवारी ७ मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली तर, सोमवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा ७ एप्रिल ते १९ मे पर्यंत सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसंच, २३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

'असं' होणार महाराष्ट्रात मतदान

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा