Advertisement

मंत्रालयात संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम...


मंत्रालयात संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम...
SHARES

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून किंवा विष घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना हे सरकारचंच नव्हे, तर प्रशासनाचंही अपयश आहे. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याने त्यावर कसं नियंत्रण आणता येईल, याविषयी मंत्रालय प्रशासन अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक हर्षल रावते प्रकरणानंतर झाली. त्यानुसार अखेर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर जाळी बसवण्यात आली आहे.

गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



जाळीसोबत विशेष बंदोबस्त

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात संरक्षक जाळी बसवण्यात आली. मात्र संरक्षक जाळी बसविल्याने सर्व प्रश्‍न सुटणार नसल्याचंही मत व्यक्‍त करण्यात येत आहे. मंत्रालयातील आत्महत्या सत्रानंतर मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच नवीन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चारही दिशेला पोलिस तैनात आहेत.


मंत्रालयाची सर्कस करू नका

मंत्रालयातील वाढते आत्महत्यांचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण असं केल्यास आपल्या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं जाईल, अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील.

त्यामुळे सरकारने ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.



हेही वाचा-

आत्महत्यालय! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन कैद्याची आत्महत्या

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न: अविनाशच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण: ३० दिवसांच्या आत व्याजासहित देणार मोबदला- बावनकुळे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा