'झोपड्या जमीनदोस्त करण्याचा डाव'

  Fort
  'झोपड्या जमीनदोस्त करण्याचा डाव'
  मुंबई  -  

  सीएसटी - केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेल्या 10 लाख झोपड्या जमीनदोस्त करण्याचा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाचा डाव असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय. केंद्र सरकारच्या जागेवरील 10 लाख झोपड्यांना 2000 सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळावं म्हणून आघाडी सरकारने कायदा केला होता. मात्र भाजपा-शिवसेनेचे सरकार केंद्राच्या जागेवरील 10 लाख झोपड्या खाली करून त्या झोपडपट्टीधारकांना तेथून हाकलवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्या जागेचं खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचे वाघमारे म्हणाले. त्यामुळे मुंबईतील 50 लाख नागरिकांचा जीवणमरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

  एकीकडे मुख्यमंत्री पंतप्रधान आवास योजनेतून 11 लाख घरे बांधण्याच्या योजनेची घोषणा करतात, तर दुसरीकडे तेच मुख्यमंत्री झोपड्या जमीनदोस्त करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.

  जोगेश्वरी पूर्वेकडील इंदिरानगर रहिवासी संघ ही रेल्वे परिसरात वसलेली झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात येत आहे. या झोपडपट्टीतील सव्वा दोनशे झोपड्या 2000 साली रेल्वेने तोडण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झोपड्या न तोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे राज्यमंत्री रवींद्र वायकर या झोपडपट्टीधारकांची दिशाभूल करत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. सरकारी कायद्याप्रमाणे झोपडपट्टीवासीयांचे संरक्षण करण्याची सरकारची जबाबदारी असतानाही सरकारने जनतेच्या बाजून स्वतःचं म्हणणं कोर्टात अजिबात मांडलं नाही. त्यामुळे मुंबईतील 10 लाख झोपड्यांचं भवितव्य टांगणीला लागले असल्याचे राजू वाघमारे यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.