लीज धोरणाचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात रोखला

 Pali Hill
लीज धोरणाचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात रोखला

मुंबई – रेसकोर्सवर थीमपार्क बांधण्याचे स्वप्न शिवसेनेचे आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या भूखंड लीज नुतनीकरण धोरणामुळे शिवसेनेचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नुकतेच सुधार समितीत मंजूर झालेले लीज धोरण शिवसेनेने बुधवारी सभागृहात रोखून धरले.

सुरुवातीला सुधार समितीत हे धोरण मंजूर होताना शिवसेनेकडून कोणताही विरोध झाला नसल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधित शिवसेना सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर सभागृहात हा प्रस्ताव शिवसेनेकडून रोखून धरला जाण्याची जोरदार शक्यता होती आणि शेवटी ही शक्यता खरी ठरली. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आल्याने आता याबाबतचा निर्णय पालिका निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेसकोर्ससह 236 भूखंडांच्या नुतनीकरण रखडले आहे.

पालिकेने लीजवर दिलल्या 4 हजार177 मालमत्तांपैकी 236 भूखंडांचा लीज करार तीन वर्षांपूर्वीच संपला आहे. मात्र अजूनही या भूखंडाचा ताबा पालिकेकडे आलेला नाही वा लीजचे नुतनीकरणही झालेले नाही. यामध्ये रेसकोर्सचाही समावेश आहे. त्यामुळे पालिकेने नवे लीज धोरण तयार केले आहे. मात्र आता हे लीज धोरण लांबणीवर पडले आहे.

Loading Comments