एमबीएचा विद्यार्थी बनला नगरसेवक

बोरिवली - मुंबई महापालिका निवडणुकीत 23 वर्षीय एमबीए विद्यार्थी नगरसेवक झालाय. हर्षद कारकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हर्षद वॉर्ड क्रमांक 6 मधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळालेल्यांमध्ये हर्षद सर्वात लहान नगरसेवक ठरला आहे. हर्षद बोरिवलीतल्या सेंट फ्रांसिस इंस्टिट्यूटमधील एमबीएचा विद्यार्थी आहे. त्याच्या या विजयामुळे त्याचे मित्र आणि शिक्षक आनंदी आहेत.

वॉर्ड क्रमांक 6 मध्ये वाचनालय उभारण्याची हर्षदची इच्छा आहे. जेणेकरून या वाचनालयाचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. वाचनालयासोबतच परिसरातल्या इतर समस्याही सोडवण्याचा तो प्रयत्न करणार आहे.

Loading Comments