Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे कोरोनानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे कोरोनानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. जास्त त्रास सुरू झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलविण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.  त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून कोरोना नियमांचे पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे फैजल पटेल यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहील, अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिलेले अहमद पटेल, सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. तसंच पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते.  हेही वाचा -

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा