Advertisement

कामगार नेते शरद राव यांचं निधन


कामगार नेते शरद राव यांचं निधन
SHARES

मुंबईतील विविध कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद राव यांचं गुरुवारी दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं. नानावाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. गोरेगावमधील एमजी रोड इथल्या ऑटोमन्स युनियनच्या कार्यालयात शरद राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. स्वाभीमान टॅक्सी-रिक्षा संघटनेचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी ही माहिती दिली. शरद राव यांच्या निधनामुळे कामगार वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येतोय.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ज्येष्ठ नेते शरद राव यांच्या निधनानं संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यापक व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जोपासणाऱ्या शरद राव यांच्या निधनानं कामगार चळवळीचं मोठं नुकसान झालंय.

दत्ता इस्वलकर , गिरणी कामगार नेते

तीन दशकांचा काळ गाजवत बेस्ट, पालिका, रिक्षा-टॅक्सी आणि इतर कामगारांना न्याय देण्याचे काम शरद राव यांनी केले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता गेल्याचं दु:ख खूप मोठं आहे.

के. के. तिवारी, मुंबई अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा संघटना

गरीब टॅक्सी-रिक्षावाल्यांसाठी आयुष्य वेचणारा असा कामगार नेता आपल्यातून गेला. रिक्षाचालकांना सरकारी नोकरदार वर्गात समाविष्ट करावे यासाठी ते आयुष्यभर लढले. जर त्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर सरकारनं त्यांची ही इच्छा पूर्ण करावी.

शरद राव यांची कारकीर्द

बेस्टमध्ये नोकरी करत शरद राव यांनी केली आपल्या कारकिर्दीची सुरुवात.

देशातील कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस त्यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी केले काम 

महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट अशा विविध कामगारांच्या संघटनांचे केले नेतृत्त्व

कामगारांचे प्रश्न सरकारपुढे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिला लढा  

कामगारांचा लढवय्या नेता अशी शरद रावांची प्रतिमा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली

 

 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा