Advertisement

सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत.

सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रुफल्ल पटेल ही चार प्रमुख नावं चर्चेत होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. 

शरद पवार यांनी राजीनामा देण्याआधी काही दिवसांपासूनच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या कागदोपत्री हालचाली सुरु झाल्या असे बोलले जाते. 

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी थेट विभागणी पक्षात केली जाण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात देशपातळीवरसुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत कामआहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात अडचण नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

अनुभव कमी पडला तर शरद पवार आहेतच. शरद पवार यांनी निर्णय बदलला नाही तर निर्णय घ्यावा लागेल. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.



हेही वाचा

शरद पवारांनी 'अशी' केली राष्ट्रवादीची स्थापना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा