Advertisement

“हे तर दाढ्या कुरवाळणारं सरकार”

एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी शरजील उस्मानी पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला.

“हे तर दाढ्या कुरवाळणारं सरकार”
SHARES

एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी शरजील उस्मानी पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला, असा दावा करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरजील प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे, हे काल पुन्हा सिद्ध झालं. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचं त्या कानाला कळलं नाही. हे तर दाढ्या कुरवळणारं सरकार, अशा तिखट शब्दांत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

हेही वाचा- हे शरजीलला संरक्षण देणारं सरकार, देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुण्यात ३० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी (sharjeel usmani) याने हिंदुत्वाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवण्यात आला. या वादग्रस्त भाषणाची व्हिडिओ क्लिप तपासून राज्याच्या गृहविभागाने शरजील विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. मात्र गुन्ह्याची नोंद होऊनही शरजीलला अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारण्यात येऊ लागला.

शरजीलच्या अटकेवरून सरकारवरील दबाव वाढल्यानंतर  शरजील बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिलं होतं. तरीही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, हे शरजीलचं सरकार आहे, शरजीलला संरक्षण देणारं सरकार आहे, अशी टीका करताना शरजीलला अटक करण्याची मागणी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच ताब्यात घेतलं जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे. 

(sharjeel usmani register a statement to pune police on elgar parishad offensive comment says bjp mla atul bhatkhalkar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा