Advertisement

आदित्यही देणार ‘विचारांचं सोनं’? दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं लक्ष


आदित्यही देणार ‘विचारांचं सोनं’? दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं लक्ष
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत जागावाटपात घ्यावी लागलेली नमती भूमिका, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पहिलीवहिली लढत या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात आदित्य देखील परंपरागत ‘विचारांचं सोनं’ वाटणार का? याचीही शिवसैनिकांना उत्सुकता लागली आहे. 

दादरच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री आपली भूमिका स्पष्ट करतील. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपने शिवसेनेला निम्म्या जागांसहीत सत्तेत निम्मा वाटा देण्याचं कबूल केलं होतं. परंतु प्रत्यक्षात जागा वाटापाच्या वेळेस मात्र शिवसेनेची कमी जागांवर बोळवण करण्यात आली. 

भाजप मोठा भाऊ झाल्याने शिवसेनेला झुकतं माप स्वीकारत १२४ जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेना आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी जागा लढत असल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. यावर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

तसंच आदित्य यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने आदित्य यांच्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरळीतून निवडणूक लढवणारे आदित्य दसरा मेळाव्यात भाषण करण्याची शक्यता आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य यांनी आपल्या भाषणांनी तरूणांना भुरळ पाडली होती. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी खास असणार आहे.  



हेही वाचा-

भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा