Advertisement

भांडुप पोटनिवडणूक, सासूच्या जागी सून आली निवडून


भांडुप पोटनिवडणूक, सासूच्या जागी सून आली निवडून
SHARES

काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक 116 मध्ये पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या पोटनिवडणुकीत प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील 11,229 अशा भरघोस मतांनी विजयी झाल्या. यामध्ये शिवसेनेचे स्थानिक आमदार अशोक पाटील यांची पत्नी मिनाक्षी पाटील यांना 4892 मतांनी पराभव पत्करावा लागला. प्रमिला पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या आणि सून जागृती पाटील या भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.

मिनाक्षी पाटील शिवसेनेच्या आणि जागृती पाटील भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. या दोघींमध्ये कोणत्या पाटलीनबाईंच्या पदरात अधिक मतांचे दान पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.


मीनाक्षी पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रमिला पाटील यांनी मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता, मात्र प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर भांडुपमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत मिनाक्षी यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला, वर्षाच्या आत मिनाक्षी पाटील यांना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. 

विद्यमान शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या विरोधातील असंतोष यावेळी पुन्हा एकदा दिसून आला. मागील निवडणुकीतही काही नाराज शिवसैनिकांनी प्रमिला पाटील यांना मतदान केले होते, याही वेळेला मिनाक्षी पाटील यांना शिवसैनिकांनी मतदान केल्याचे दिसत नाही.


पोटफाडून भाजपाचा विजय - शेलार

या पोटनिवडणुकीतही मुंबईकरांनी भाजपालाच साथ दिल्याची प्रतिक्रिया भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून दिली आहे.





भांडुप (पश्चिम) प्रभाग क्र. ११६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी २१ हजार ६६८ पुरुष आणि १६ हजार ४३७ स्त्रिया असे एकूण ३८ हजार १०५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सात ठिकाणी २९ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली.


सात उमेदवार होत्या निवडणुकीच्या रिंगणात

या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील, भाजपाच्या जागृती पाटील, काँग्रेसच्या प्रमिला प्रेमासिंह यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. दिवंगत प्रमिला पाटील यांचा धाकटा मुलगा कौशिक पाटील यांच्या दहशतीपुढे आणि भाजपाच्या ताकदीपुढे शिवसेनेची पाचावरण धारण बसली असून मागील चार दिवसांपासून भांडुपमध्ये निवडणूक प्रचारांना राडेबाजीचे स्वरुप आले होते. दोन्ही गटांकडून मारहाणीचे प्रकारही घडले. या निवडणुकीची मतमोजणी १२ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘एस’ विभाग कार्यालयाच्या ठिकाणी झाली. आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता, पण भांडुप पोटनिडणूक ही अपवाद ठरली.


उमेदवारांना मिळालेली मते


उमेदवार नावमिळालेली मते
गजधने वैशाली सतीश206
दीपिका विजय जाधव51
अॅड. स्मृती तुळशीदास जाधव49
जागृती प्रतीक पाटील11129
मिनाक्षी अशोक पाटील6337
बेबीताई सावंत339
प्रमिला प्रेम सिंह972
नोटा213
एकूण19296


भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेची जबाबदारी खासदार विनायक राऊत आणि आमदार अशोक पाटील यांच्यावर होती. तर भाजपाच्या उमेदवाराची जबाबदारी महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्यावर होती. कोटक पहिल्या दिवसांपासून भांडुपमध्ये तळ ठोकून होते. मनोज कोटक यांनी जागा निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती आणि ही जागा निवडून आणली. 


हेही  वाचा - 

भांडुपच्या पोटनिवडणुकीत कोण कमकुवत, कोण भक्कम? वाचा...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा