Advertisement

दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उद्धवचा सरकारला टोला

उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं असून त्याद्वारे आॅनलाईनच्या माध्यमातून दारू घरपोच पोहचवण्याचा प्रकार म्हणजे हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. आॅनलाईन दारू पोहचवणं ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत त्यांनी घरपोच दारू देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उद्धवचा सरकारला टोला
SHARES

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी राज्य सरकारनं एक अजब उपाय शोधून काढलाय, तो म्हणजे आॅनलाईन दारू विक्री, अर्थात घरपोच दारू देण्याचा उपाय. सरकारच्या या निर्णयावर चारही बाजूनं टीका होत असून अशी घोषणा करणारे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल होत अाहेत. असं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दारू घरपोच पोहचवण्याच्या निर्णयावरून सरकारला कोंडीत पकडलं अाहे. दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे.


हास्यास्पद आणि धक्कादायक

उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं असून त्याद्वारे आॅनलाईनच्या माध्यमातून दारू घरपोच पोहचवण्याचा प्रकार म्हणजे हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. आॅनलाईन दारू पोहचवणं ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत त्यांनी घरपोच दारू देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तर दारू घरपोच पोहचवण्याएेवजी दुष्काळग्रस्तांना मदत घरपोच पोहचवा अशी मागणी त्यांनी केली आहे.


दुष्काळी परिस्थिती भयानक 

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक असून केंद्राचा अहवाल येईल तेव्हा येईल.  दुष्काळग्रस्तांना त्वरीत मदत करा, त्यांना रांगेत उभं रहायला सांगू नका. त्यांना दारू नको, त्यांना मदत हवी आहे, असंही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे.हेही वाचा - 

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता आपल्याला कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा

राष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यभर एल्गार
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement