Advertisement

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यशवंत जाधव यांच्या हाती

स्थायी समिती अध्यक्ष बनून यशवंत जाधव यांनी महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत. या माध्यमातून तब्बल १५ वर्षांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा मान शहराला मिळाला आहे.

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यशवंत जाधव यांच्या हाती
SHARES

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. समिती अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे पिठासिन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचं घोषित केलं. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष बनून यशवंत जाधव यांनी महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत. या माध्यमातून तब्बल १५ वर्षांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा मान शहराला मिळाला आहे.


यशवंत जाधव यांची कारकिर्द

यशवंत जाधव हे मार्च १९९७मध्ये प्रथम निवडून आले होते. यामध्ये सन २०००-२००१ या वर्षी त्यांनी स्थापत्य समिती अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते परत निवडून आले होते. या कालावधीत त्यांनी उद्यान आणि बाजार समिती अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडून आल्या होत्या. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंत जाधव हे निवडून आल्यावर त्यांची शिवसेना महापालिका गटनेतेपदी निवड झाली आणि ते सभागृहनेतेपदी विराजमान झाले होते.


'ही' परंपरा मोडीत काढली

आजवर स्थायी समिती अध्यक्ष बनून सभागृहनेते बनण्याची परंपरा होती, परंतु शैलेश फणसे यांच्या पाठोपाठ यशवंत जाधव यांनी ही सभागृहनेते पदावरून स्थायी समिती अध्यक्ष बनण्याची ही परंपरा कायम ठेवली आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यावर आपल्या भाषणात त्यांनी, महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं. 

मालमत्ता कर थकवल्यामुळे होणारी दंडात्मक आणि जप्तीच्या कारवाईचेही यशवंत जाधव यांनी समर्थन केलं आहे. कापडी पिशव्या बंद होत असल्याने यासाठी ज्यूट पिशव्यांचे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक हाऊस गल्ल्याना पारदर्शक दरवाजे बसवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा - 

मंगेश सातमकर यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा चौकार

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा