Advertisement

शिवसेनेने दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही- उद्धव ठाकरे

शिवसेनेने भाजपासोबत केवळ दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती झालेली असून ही युती अभेद्य आहे. अवजड मंत्रालयाबाबत शिवसेना पूर्णपणे समाधानी आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही- उद्धव ठाकरे
SHARES

शिवसेनेने भाजपासोबत केवळ दोन-तीन पदांसाठी युती केलेली नाही. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती झालेली असून ही युती अभेद्य आहे. अवजड मंत्रालयाबाबत शिवसेना पूर्णपणे समाधानी आहे. शिवसेनेने भाजपाकडे केलेली मागणी चोरून नाही, तर हक्काने केली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला. कोल्हापूर येथील अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.  

केंद्रीय मंत्रिमंडळातील खासदारांचा शपथविधी होऊन, त्यांच्यात खातेवाटप होऊन आठवडा उलटत आला, तरी शिवसेना अजूनही चांगल्या खात्याच्या मागणीवर अडून बसली आहे. एवढंच नव्हे, तर शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदावरही दावा केल्याच्या बातम्या सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.  

शिवसेनेच्या ३ मागण्या

राजकीय वर्तुळात फिरत असलेल्या चर्चांनुसार, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तील घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेला आणखी मंत्रिपदे मिळावीत, अशी इच्छा आहे. त्यासाठी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने भाजपाकडे ३ मागण्या केल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी म्हणजे शिवसेनेला मंत्रिपदे वाढवून मिळावीत. 

आणखी मंत्रीपद

लोकसभेत शिवसेनेचे १८, तर राज्यसभेत ३ असे एकूण २१ खासदार आहेत. शिवसेना भाजपानंतर एनडीएतील सर्वाधिक जागा असलेला घटकपक्ष ठरला आहे. असं असूनही शिवसेनेला केवळ एकच मंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे आपल्या जागेच्या तुलनेत मंत्रीपद वाढवून मिळण्याची शिवसेनेची मागणी आहे.   

अवजड नको ‘जड’ खातं हवं

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना अवजड मंत्रालय देण्यात आलं आहे. या मंत्रालया अंतर्गत बहुतेक बंद पडलेले किंवा आजारी कारखाने येतात. त्यामुळे हे खातं राजकीयदृष्ट्या दुय्यम समजलं जातं. पहिल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात देखील शिवसेनेच्या वाट्याला हेच मंत्रालय आलं होतं. त्यामुळे या खात्याऐवजी महत्त्वाचं खातं देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे.   

उपाध्यक्षपद मिळावं

शिवसेनेची तिसरी मागणी आहे की, भाजपाने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं. यवतमाळमधील खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. भाजपाने ही मागणी मान्य केल्यास गवळी यांना या पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.  



हेही वाचा-

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज

मनसे स्वबळावर लढवणार विधानसभा?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा