Advertisement

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा


उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा
SHARES

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. पण या चर्चेचा तपशीलच अद्याप समजू शकलेला नाही.


या प्रकल्पाला सेनेचा विरोध

रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि मिलिंद नार्वेकर या बैठकीला उपस्थित होते. बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवणाऱ्या नागरीकांचे पत्रांचे गठ्ठे मुख्यमंत्र्यांना देत स्थानिकांसह शिवसेनेचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले.


पुन्हा युती होणार?

या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर या दोन नेत्यांची पहिलीच बैठक असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे जाहीर केले असले तरी भाजपकडून पुन्हा युती करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा