‘ते’ जोशींचं वैयक्तिक मत- नीलम गोऱ्हे

मनोहर जोशींनी केलेलं विधान त्यांचं वैयक्तिक आहे. शिवसेनेची ही भूमिका नाही, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

SHARE

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना हे मान्य असावं, असं वाटत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं. त्याबद्दल विचारणा केली असता ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

हेही वाचा- ‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं

छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसांत वाद करण्यापेक्षा थोडं सहन करावं, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहानं सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री आहे.  सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे, असं वक्तव्य जोशी यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

 

त्यावर प्रतिक्रिया देताना गोऱ्हे म्हणाल्या, मनोहर जोशींनी केलेलं विधान त्यांचं वैयक्तिक आहे. शिवसेनेची ही भूमिका नाही. त्यांच्या पिढीच्या मनात अशाप्रकारच्या भावना असणं स्वाभाविक आहे. सध्या सत्तेत असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी मजबूत असून ती राज्यात योग्यप्रकारे काम करत आहे.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या