Advertisement

देशात केवळ दोनच राज्यपाल, संजय राऊतांची पुन्हा टीका

देशात केवळ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अशा दोनच राज्यात राज्यपाल आहेत. इतर कुठल्या राज्यात राज्यपाल आहेत, असं मलातरी दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

देशात केवळ दोनच राज्यपाल, संजय राऊतांची पुन्हा टीका
SHARES

देशात केवळ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अशा दोनच राज्यात राज्यपाल आहेत. इतर कुठल्या राज्यात राज्यपाल आहेत, असं मलातरी दिसत नाही, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. (shiv sena leader sanjay raut slams governor and bjp)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्त संजय राऊत म्हणाले की, राज्यपाल जे असतात, ते भारत सरकार आणि राष्ट्रपती यांच्यातील राजकीय दुवा असतात. सध्याच्या स्थितीत बघायचं झालं, तर मला देशातील केवळ दोनच राज्यांमध्ये राज्यपाल दिसून येतात. ती राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. कारण या राज्यांमध्ये भाजप विरोधी सरकार आहे. इतर राज्यांमध्ये राज्यपाल आहेत, असं मला तरी दिसत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं.

हेही वाचा - राज्यपालांना दिलेलं उत्तर हा तर ऐतिहासिक दस्तावेज- संजय राऊत

राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरून सध्या भाजप आक्रमक झाला आहे. त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देत मंदिरं खुली करण्याविषयी विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत राज्यपालांना उत्तर दिलं होतं. 

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या इंग्रजी पत्राला परखड अशा मराठी ठाकरी भाषेत दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा