Advertisement

त्यांची एवढी हिंमत झालीच कशी?, उर्मिलाचा बाबा रामदेववर निशाणा

‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे’, असं वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला आहे. हे वक्तव्य अत्यंत अमानुष आणि घृणास्पद असल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे.

त्यांची एवढी हिंमत झालीच कशी?, उर्मिलाचा बाबा रामदेववर निशाणा
SHARES

‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे’, असं वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर अभिनेत्री आणि शिवसेना (shiv sena) नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला आहे. हे वक्तव्य अत्यंत अमानुष आणि घृणास्पद असल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून व्यक्त होताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथं आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मगच ही टरटर करा. हे वक्तव्य सर्वात अमानुष, क्रोध आणणारं आणि घृणास्पद आहे. हे कुणाचं टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली? याआधी अभिनेत्री तापसी पन्नूने देखील एक ट्विट करत बाबा रामदेव यांना शालजोडीतले हाणले होते.

काय म्हणाले होते बाबा रामदेव?

‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिवीर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं कोरोनावर (coronavirus) उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधं घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे,’’ असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नव्या वादाला तोंड फुटलं. शिवाय डाॅक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरं देण्याचं आव्हानही बाबा रामदेव यांनी दिलं.

हेही वाचा- पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू- नाना पटोले

१ कोटींचा मानहानीचा दावा

रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावर डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना आपलं वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं. तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंडच्या शाखेडकून बाबा रामदेव यांच्यावर १ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा देखील दाखल करण्यात आला आहे. 

असोसिएशनचे सचिव डाॅ. अजय खन्ना म्हणाले, रामदेव बाबांना अॅलेपॅथी मधला अ सुद्धा कळत नाही. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही त्यांना देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिद्ध करून दाखवावी. त्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांची मुदत देत आहोत. 

या प्रकरणी मोठा वादंग निर्माण झाल्यावर रामदेवबाबांनी यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेलं “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचं बाबा रामदेव यांनी जाहीर केलं.

(actress and shiv sena leader urmila matondkar slams baba ramdev on his allopathy comment)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा