Advertisement

प्रताप सरनाईकांना दिलासा, अटकेपासून मिळालं संरक्षण

शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक तसंच त्यांच्या कुटुंबियावर सद्यस्थितीत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) दिले आहेत.

प्रताप सरनाईकांना दिलासा, अटकेपासून मिळालं संरक्षण
SHARES

शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक तसंच त्यांच्या कुटुंबियावर सद्यस्थितीत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) दिले आहेत. यामुळे सरनाईक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालय अशा १० ठिकाणी अंमलबजावणी संचलनालया (ईडी) च्या पथकाने काही दिवसांपूर्वी छापे मारले होते. टॉप्स सिक्युरिटी कंपनीने एमएमआरडीएला पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीने स्पष्ट केलं. ईडीने सरनाईक यांचे चिरंजीव विहंग यांची जवळपास ६ तास चौकशी केली. तसंच प्रताप आणि विहंग सरनाईक यांना समन्स बजावत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं.

मात्र अद्याप प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे विहंग सरनाईक रुग्णालयात होते. त्यामुळे तेही चौकशीला हजर नव्हते. तर परदेशातून आलेले प्रताप सरनाईक होम क्वांरटाईन झाले होते. त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने कधीही चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं. त्यातच सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षणासाठी संरक्षण मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.

हेही वाचा- "प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय”

त्यावर, ईडीने प्रताप सरनाईक यांच्यावर सूडबुद्धीने कुठलीही कारवाई करू नये. प्रताप सरनाईक यांच्या चौकशीच्या वेळेस त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत व्हिडिओ चित्रिकरण (आवाज वगळून) करावं. सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवता येऊ शकतं, परंतु त्यांना अटक करता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात सहकुटुंब  दर्शनासाठी आलेल्या प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल आणि प्रत्येक संकटातून बाहेर येईल, असा निर्धार व्यक्त केला.

तसंच ईडीकडे मी जेव्हा मुदत मागितली तेव्हा त्यांनी मला मुदत दिली होती. तेव्हा ईडी ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवेल, तेव्हा मी चौकशीसाठी हजर होईन, असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

(shiv sena mla pratap sarnaik gets protection from arrest by supreme court)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा