Advertisement

“प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय”

दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल आणि प्रत्येक संकटातून बाहेर येईल,” असा निर्धार शिवसेनेचे ठाण्यातील आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

“प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय”
SHARES

“दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल आणि प्रत्येक संकटातून बाहेर येईल,” असा निर्धार शिवसेनेचे (shiv sena) ठाण्यातील आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात सहकुटुंब  दर्शनासाठी आलेल्या प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ईडीच्या कारवाईसंदर्भात माहिती दिली.

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. पण ते तानाजी मालुसरे १६ व्या शतकातील होते. हा तानाजी २१ व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचं रक्षण करताना धारातीर्थी पडले होते.पण  हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल आणि प्रत्येक संकटातून बाहेर येईल. 

ईडीने पाठवलेल्या नोटिशींचं उत्तर देण्यात आलं आहे. ईडीने अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली आहेत. त्यामुळे ईडीला तपासात आवश्यक ती सर्व मदत करायची ही, प्रताप सरनाईकची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहिल. ईडीकडे मी जेव्हा मुदत मागितली तेव्हा त्यांनी मला मुदत दिली होती. तेव्हा ईडी ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवेल, तेव्हा मी चौकशीसाठी हजर होईन, असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- प्रताप सरनाईकांनी ‘इतके’ पैसे लाटले, ईडीचा दावा

सोबतच जगावरील कोरोनाचं संकट आणि सरनाईक कुटुंबावरील ईडापिडा टळो, यासाठी बाप्पाला गाऱ्हाण घातल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांना सक्तवसुली संचलनालयाने तिसऱ्यांदा समन्स पाठवला आहे. यापूर्वी दोनवेळा त्यांना समन्स बजावण्यात आला होता. पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक चौकशीही केली होती. 

परंतु पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे विहंग सरनाईक हे रुग्णालयात होते. त्यामुळे तेही चौकशीला हजर नव्हते. परदेशातून आलेले प्रताप सरनाईक हे होम क्वांरटाईन झाले होते. त्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यामुळे केव्हाही त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

(shiv sena mla pratap sarnaik visited siddhivinayak temple at prabhadevi)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा