Advertisement

मुंबई महापालिकेच्या एफडी मोडा, मोफत लसीकरणासाठी शिवसेना नेत्याची शक्कल

महापालिकेच्या विविध बँकांमध्ये असलेल्या मुदती ठेवी मोडून लसीकरणाचा खर्च त्यातून करावा, अशी विनंती शिवसेना नेत्याने केली आहे.

मुंबई महापालिकेच्या एफडी मोडा, मोफत लसीकरणासाठी शिवसेना नेत्याची शक्कल
SHARES

येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करायचं झाल्यास त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. हा खर्च सरकारला नेमका पेलणार का व कसा? यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याआधीच महापालिकेच्या विविध बँकांमध्ये असलेल्या मुदती ठेवी मोडून लसीकरणाचा खर्च त्यातून करावा, असा सल्ला शिवसेना खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून तशी मागणी केली आहे. आपल्या पत्रात शेवाळे यांनी नमूद केलं आहे की, देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून त्यावर तातडीने लसीकरण मोहीम राबवणं हाच एकमेव पर्याय आहे. त्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रासह मुंबईतील वैद्यकीय सेवा आपल्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने सर्व सर्वसामान्य नागरिकांना सेवा देत आहे. 

महाराष्ट्रातील सर्वच १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. त्यासाठी या लसीकरणाकरीता साधारणत: ५५०० कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. व याकरीता शासनाचा बराचसा निधी खर्च देखील झाला आहे.

हेही वाचा- १ मे नंतरही लाॅकडाऊन वाढणार? काय म्हणाले मंत्री?

मुंबई महापालिकेकडे ७९ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी बँकेकडे जमा आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याकारणाने मुंबईने महाराष्ट्राला व देशाला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्या अनुषंगाने जर राज्य सरकारकडे आर्थिक तरतूद नसेल तर महानगरपालिकेकडच्या जमा मुदत ठेवी मोडून राज्यात लसीकरणाची मोहीम राबवण्यात यावी. तसंच राज्य सरकारकडून पैसे मिळाल्यावर परत महापालिकेकडे जमा करण्यात यावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकांची संख्या ५ कोटी ७१ लाखांच्या दरम्यान आहे. या सगळ्यांना लसींचे दोन्ही डोस द्यायचे असतील, तर आपल्याला १२ कोटींच्या दरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल. 

राज्य सरकार लस खरेदी करून लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा आहे की इतक्या लसी सध्याच्या घडीला उपलब्ध आहे का? किंवा येत्या दिवसांत तरी एवढा साठा मिळेल का?   

देशातील दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना म्हणजेच कोव्हिशिल्डसाठी सीरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बायटेकला आम्ही पत्र लिहिलेली आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेलं नाही, अशी माहिती नुकतीच राजेश टोपे यांनी दिली.

(shiv sena mp rahul shewale suggest to use bank FD of bmc for free covid 19 vaccination in maharashtra)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा