Advertisement

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेनेची पुन्हा मागणी

शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेनेची पुन्हा मागणी
SHARES

शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित आणि बिरसा मुंडा यांनी लोकसभेत ही मागणी केली आहे. परंतु या मागणीला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हिंदुत्ववादी विचारसरणीची शिवसेना सेक्युलर विचारसरणीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत कसं जुळवून घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यावर उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलर हा शब्द राज्यघटनेतच असून आम्ही त्याचा आदर करत असल्याचं म्हटलं होतं.

बुधवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी करणारी शिवसेना मवाळ होणार का? सावरकरांच्या मुद्द्यावर तटस्थ भूमिका स्वीकारणार? असेही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्यातच पुन्हा वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मात्र या मागणीला जोरदार विरोध केला.   हेही वाचा-

शिवसेनेची भूमिका बदलली? अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी

वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा