शिवसेनेची भूमिका बदलली? अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी

शिवसेनेकडून लोकसभेत चक्क लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.

SHARE

निवडणुकीआधी वीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने करणाऱ्या शिवसेनेकडून लोकसभेत चक्क लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही बदललेली भूमिका मंगळवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.

हेही वाचा- वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमार

आपल्या विपुल साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी केली. शेवाळे यांनी काही महिन्यांपूर्वी या मागणीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पाठवलं होतं. 


त्याआधी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी कुठल्याही शिफारशीची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं.हेही वाचा- 

सावित्रीबाई फुले-महात्मा फुले यांना भारतरत्न? केंद्राच्या हालचाली सुरू

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या, काँग्रेसचं पंतप्रधानांना पत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या