Advertisement

उर्मिलाच्या नियुक्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

विधान परिषदेवर करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नियुक्तीपैकी एका जागेवर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

उर्मिलाच्या नियुक्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
SHARES

राज्यपालांच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नियुक्तीपैकी एका जागेवर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना नेते खासदार यांनी प्रतिक्रिया देताना मीदेखील अशी चर्चा ऐकतोय, असं राऊत म्हणाले.

विधान परिषदेवर पाठवण्यासाठी कुठल्या नावांची शिफारस करायची, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ घेत असते. मंत्रिमंडळात एकमताने निर्णय होतात आणि त्यांची अंमलबजावणी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत. शिवाय शिवसेनेकडून कुणाच्या नावाची शिफारस करायची याबाबतचा अंतिम निर्णय देखील उद्धव ठाकरे घेच घेतील. तेव्हा शिवसेनेने कुठल्या नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे, हे लवकरच कळेल, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: याबाबत उर्मिलाशी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु उर्मिलाने ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. (shiv sena mp sanjay raut reacts on actress urmila matondkar nomination for maharashtra vidhan parishad seat)

हेही वाचा- विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?

या १२ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपालांना करणार आहे. त्यानुसार या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली आहे.

यापैकी एका जागेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उर्मिला मातोंडकर या अभिनय क्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होणार नाही, असं म्हटलं जात आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या. अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूड आणि मुंबईवर केलेले आरोपांना उर्मिला  यांनी सडेतोड उत्तर दिलं हाेतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement