Advertisement

विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?

विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?
SHARES

महाराष्ट्र विधान परिषदेवर लवकरच राज्यपालांच्या कोट्यातून १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यापैकी एका जागेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्वत: याबाबत उर्मिलाशी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु उर्मिलाने ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

विधान परिषदेच्या (maharashtra vidhan parishad) राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत. संविधानातील तरतूदींनुसार राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत, अशी अपेक्षा असते. परंतु काही अपवाद वगळता राजकीय पक्षांकडून बहुतांशी आपापल्या नेतेमंडळींचीच शिफारस या जागांसाठी करण्यात येते. (shiv sena might nominate actress urmila matondkar for maharashtra vidhan parishad seat)

हेही वाचा - केवळ मराठीचा आग्रह धरणं संविधानविरोधी- रामदास आठवले

त्यानुसार राज्य सरकारकडून याआधीही काही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीला नकार दिला होता. सद्यस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) यांच्यातील सख्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने देखील सावध पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे.

या १२ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपालांना करणार आहे. त्यानुसार या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली आहे.

यापैकी एका जागेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उर्मिला मातोंडकर या अभिनय क्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होणार नाही, असं म्हटलं जात आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या. अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूड आणि मुंबईवर केलेले आरोपांना उर्मिला  यांनी सडेतोड उत्तर दिलं हाेतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा