Advertisement

महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं- संजय राऊत

या कारवाईचा राज्य सरकार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप (bjp) नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं- संजय राऊत
SHARES

महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. पोलिसांनी कुणावरही कारवाई केली असेल, तर ती पुराव्यांच्या आधारेच केली असेल. या कारवाईचा राज्य सरकार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप (bjp) नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. या अटकेचे देशभरात पडसाद उमटले असून भाजप नेत्यांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. 

यासंदर्भात संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथं कायद्यानुसार कारवाई केली जाते. एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यानुसारच पोलिसांनी ही कारवाई केली असेल. 

हेही वाचा- तर माझा नवरा जिवंत असता, अक्षता नाईक यांचा अर्णबवर आरोप

महाराष्ट्रात ठाकरे सरकारची (thackeray government) स्थापना झाल्यापासून कुणावरही सूडभावनेने कारवाई करण्यात आलेली नाही. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सरकार किंवा राजकीय पक्षाशी संबंध असण्याचं कारण नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुम्ही न्यायालय किंवा तपास यंत्रणा नाही. तुम्ही कोणाविरोधातही काहीही सांगून लोकांची दिशाभूल करु शकत नाही. असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तेव्हा त्यांनाही हा काळा दिवस आहे विचारणार का? भारतात प्रसारमाध्यमांना जितकं स्वातंत्र्य आहे तितकं स्वातंत्र्य कुठेच नाही. यूपीमध्ये पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते, त्याबद्दल कोणी बोलत नाही, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सोबतच, अर्णब गोस्वामी यांनी मागील काही महिन्यात आपल्या रिपब्लिक चॅनेलवरून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांचीही चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

(shiv sena mp sanjay raut reacts on arnab goswami arrest)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा