Advertisement

बिहारमध्ये कोरोना संपलाय का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

बिहारमध्ये कोरोना संपलाय का ? अशी विचारणा करत सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, कोरोना संपला असं वाटत असेल, तर निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

बिहारमध्ये कोरोना संपलाय का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
SHARES

बिहारमध्ये कोरोना संपलाय का ? अशी विचारणा करत सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, कोरोना संपला असं वाटत असेल, तर निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुका आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या कनेक्शनवर भाष्य केलं. (shiv sena mp sanjay raut reacts on bihar assembly election during covid 19 pandemic)

यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर हाताला काम हवंय. लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना हातावर फक्त काळी शाई लावून घ्यायची नाहीय. त्यामुळेच निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का? याचा विचार व्हायला हवा. कोरोना संपला असेल, तर मग निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं. खरं तर निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था असली, तरी हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. किमान असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - “त्यानंतर मुंबईवरचं प्रेम उफाळून येईल”

बिहारमध्ये सुशासन नावाचा प्रकार नाही. सरकारविषयी तिथल्या जनतेच्या मनात नाराजी आहे. विकासाचा कुठलाही मुद्दा नाही, जनतेचं लक्ष या विषयांवरून विचलित करण्यासाठीच सुशांत सिंह राजपूतच्या नावावर भावनिक मुद्दे तापवले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून केलेलं हे राजकारण आहे. सुशांत हाच तिथं प्रचाराचा मुद्दा असून त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं त्याचे पोस्टर छापून प्रचारात देखील आणले आहेत. सुशांत प्रकरणावरून सगळं नाट्य रचण्यात आलं. दिग्दर्शन, नेपथ्य, संहिता, पार्श्वसंगीत सगळं काही ठरवून करण्यात आलं. तिथल्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदे ओढण्याचं काम केलं. मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा दिला असून ते आता बक्सरमधून निवडणूक लढत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

बिहारमधील निवडणुका घाईघाईत होत नसून वेळेतच होत आहेत, परंतु सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही. लालूप्रसाद यादव इस्पितळात आहेत. काँग्रेसचं तिथं फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिला, ३ नोव्हेंबरला दुसरा आणि ७ नोव्हेंबरला मतदानाचा तिसरा टप्पा असेल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होईल. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

हेही वाचा - राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा