Advertisement

'त्या' ४ ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिस करणार चौकशी - संजय राऊत

शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद घेतली.

'त्या' ४ ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिस करणार चौकशी - संजय राऊत
SHARES

ईडी (ED) आणि त्यांचे काही अधिकारी भाजपची (BJP) एटीएम मशीन झाले आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत, अशी घोषणा शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

विशेष म्हणजे राऊत यांनी यावेळी या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती दिली. ईडी हे सारे भाजपच्या काही नेत्यांच्या संगनमतानं करत असून, त्यातून खोऱ्यानं पैसा गोळा करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप यावेळी राऊत यांनी केला.

तसंच येणाऱ्या काळात ईडीसोबतच्या त्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत म्हणाले की, माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला.

हा सारा पैसा विदेशात जातोय. त्या मागे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये भाजपचे नेतेही सहभागी आहेत. तुम्हाला याची माहिती देतोय. हे हवेत बोलत नाही. पुढच्या पत्रकार परिषदेत त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

काही जण कागदांवर बोलताना ना. आम्हीही ईडीला कागद दिलाय, पण त्याकडे तर कुणी पाहिलं नाही. आता मुंबई पोलीस अख्ख्या विश्वात बेस्ट आहे. तेच याची चौकशी करतील, असा इशारा त्यांनी दिला.



हेही वाचा

IT छापेमारीवर आदित्य म्हणाले, “महाराष्ट्र झुकणार नाही”

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा काढणार भव्य मोर्चा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा