Advertisement

संजय राऊतांचं बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण, म्हणाले...

विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यांच्यासोबत 46 पेक्षा जास्त आमदार असल्याचं समजतेय.

संजय राऊतांचं बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण, म्हणाले...
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना चर्चा करण्याचं आमंत्रण दिलेय. का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय.

चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केलेय.

विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं समजतेय.

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलेय.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले.



हेही वाचा

Maharashtra Political Crisis: बंडखोर नेते एकनाथ शिंदे ईडीच्या कचाट्यात, संजय राऊत यांचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर, पहा नावे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा